दि.१२ नोव्हेंबर 1984 सांगली आकाशवाणी वर प्रसारित
निवेदक
मुलांनो, आपण हा रिमझिम पडणारा पाउस
पाहतो, चैतन्याने नटलेली ही हिरवी सृष्टी, थुई थुई नाचणारा मोर सगंल पाहतो.
आनंदाने डोलणारी झाडे पाहतो, सारी पृथ्वी कशी मोठया आनंदाने या पर्जन्यराजाचे
स्वागत करत असते. त्याच्या वर्षावात कशी न्हात असते. खूद्मप म्हणजे अगदी खूप खूप वर्षांपूर्वी, या
नाटकातल्या कालात असे काही नव्हते बरं का. शेवटी गोष्टीतलाच काल तो. त्या काली
समुद्र आणि पृथ्वी शेजारी शेजारी रहायचे. सूर्य मात्रं कुठे तरी लाबं राहात असे
उजेड नाही, वारा नाही, पाउस नाही, पाणी नाही, जमीन वैराण होती, अगदी कोरडी होती. झाडे तर राहू द्याच पण साधं
एक गवातांचं पातं देखील नव्हतं. असणार तरी कसं म्हणा. कारण त्या काली पाऊसच पडत
नसे. पृथ्वीला याचं फार फार वाईट वाटायचं. तिला हसणारी, खेलणारो, बागडणारी,
नाचणारी हिरवीगार वनराई हवी होती. तर मग ही गंमत घडलीच कशी? ऐका तर आमच्या या
नाटुकलीत. नाटकातील तात्पर्य मात्र लक्षात ठेवायचं बरं का.
-
म्युझिक -
समुद्र - ए पृथ्वी ताई, अग लक्ष कुंठ असंतं तुझं. अगदी
खिन्न असतेस बघ. कुठे जात येत नाहीस. तश्शी बसून राहतेस. मी बघ सगलीकडे कसा छान
उडया मारत फिरत असतो आणि तू मात्र वेडाबाई नुसती कुठे तरी बघत बसून राहतेस. काय
होतं ते तरी सांग, काय हवयं ते तरी सांग, कोणी काही बोललं का, कोणी त्रास दिला का
सांग तरी मला.
पृथ्वी - नाही रे समुद्र दादा, मला कोण त्रास देणार. पण
मी सारखा विचार करीत असते की, तू सगलीकडे वाहात का नाही जात म्हणजे माझ्या सगलया
मातीला पाणी मिलाते असते.
समुद्र - पण मी कसा वाहात जाणार तूच म्हणत नाहीस का की
समुद्राला किना - याचं बंधन असतं.
पृथ्वी - बरोबर आहे रे. पण खरंच समुद्र दादा, हे बधंन
नसतं तर कित्ती छान झालं असतं. समुद्र म्हणजे काय झाल असतं तू जरी माझ्या जवल
असलास तरी मला मात्र पाणीच मिलत नाही. तुझे पाणी मला मिलाले तर कित्ती मजा होईल
माहित आहे का माती आणि पाणी एकत्र आले की सगलीकडे आनंदी आनंद पसरेल.
समुद्र - ते खरं गं. पण हे जमणार कसं? माझ्या जवलचं
इतकं पाणी तुझ्या मातीपर्यन्त पोहोचणार कसं.? मला तर काही सुचतच नाही.
पृथ्वी - आपण असं कर, या का? आपण त्या हिमालय पर्वताला
विचार, या. तो खूप
हुषार आहे. तो आपल्याला नक्कीच काही तरी
उपाय सांग्रेल.
समुद्र - चालेल,चल जाऊ या.
स.पृ. - ए हिमालय दादा, उठणार का? आमच्याशी बोलणार का
पृथ्वी आमचं एक कोडं तू सोडवणार का?
हिमां. - कोडं? हो हो नक्कीच. मी वाटच बघत असतो
कोडयांची. कोडी मला खूपच आवडतात. बोला काय नुमचा प्रश्न आहे.? लगेच सांगतो उत्तर.
पृथ्वी - मी आहे पृथ्वी, माझ्या जवल भरपूर माती आहे.
आणि हा आहे समुद्र, याच्या जवल भरपूर पाणी आहे. पण हे पाणी मला मिलूचशकत नाही.
आम्हाला काही तरी उपाय सांग. समुद्राचं पाणी मला मिलेत, सगली कडची माती भिजेल अशी
काही तरी जादू कर.
हिमां - जादू? जादू कसली? अग युक्ती करायची. जादू
म्हणजे युक्तीच असते. हो की नाही?
पृथ्वी - तेच ते. काही तरी युक्ती सांग, लवकर सांग,सांग
ना रे लवकर.
हिमा. - सागंतो. तुम्ही सूर्याला ओलखता का९ हो
त्यात्याकडे जा, त्याला मैत्री करायला आवडते. तो खूष होईल तुम्हाला बघून. त्याला
सांगा आमच्या जवल राहायला ये. पण जपून हं.
त्याला खूम जवल बोलवू नका.
समुद्र - हो हो, नाही तर त्याच्या उन्हामुले आम्ही
भाजूनच निघू. पण काये रे तो जवल आला की पृथ्वीला कसं काय पाणी मिलेल?
हिमां. - सूर्याच्या उषणतेने तुझ्या पाण्याची वाफ होईल,
ती आकाशात वर वर जाईल आणि मग पृथ्वीला पाणी मिलेल.
स.पृ. - छान छान. समुद्र आत्ताच आम्ही जातो. धावत धावत
जाउन सूर्याला गाठतो.
-
म्युझिक -
स.पृ. - सूर्य नारायणा, ए सूर्य नारायणा समुद्र आम्ही
तुझ्याकडे एका कामासाठी आलो आहोत. पृथ्वी तू आमचा मित्र होशील का ?
सूर्य - हे काय विचारायला हवे का ? मला मैत्री करायला
खूप आवडते. म्हूणन तर सगळे मला मित्रव म्हणतात. तुम्हाला पाहून मला खूप आनंद झालास.
पृथ्वी - मग सांग तू आमच्या जवळ राहायला येशील का ?
सूर्य - हो येईन. पण त्यामुळे तुमचा असा काय फायदा
होणारे ?
समुद्र - तू जवळ आलास की तुझ्या उष्णतेने माझ्या
पाण्याची वाफ होईल, ती उडून आकाशात जाईल आणि ते पाणी या पृथ्वीला मिळेल.
सूर्य - फारच छान, फारच छान. ही गंमत तर मला आंवडली
बुवा. मग कधी येऊ मी राहायला ?
पृथ्वी - लगेच.ये
-
म्युझिक -
समुद्र - ए पृथ्वी ताई, आता ग काय करायंचं.? आपण
सूर्याला जवल राहायला बोलावंलं. तो आलाही. पण माझ्या पाण्याची वाफ होते ती आणि
आकाशात जाऊन थांबते. माझ्या आणि सूर्याच्या मध्ये हे ढग अडकून बसल्यामुले आता
बाकीच्या पाण्याची वाफ होण पण थांबलयं.हो ना आणि तुला पाणि मिलत नाही ते नाहीच.
पृथ्वी - मला वाटतं आपण आपले पुन्हा हिमालयकडे जावं.
जाऊ या का?
समुद्र - हो, हो. चल. जायलच हव.
- म्युझिक -
हिमा. -
काय रे समुद्रा, काय ग पृथ्वी, पुन्हा आलात, पण हसत नाही आलांत. तुमच्या प्रश्नाचं
उत्तर कुठे तरी चुकलयं का?
समुद्र - तसं नाही रे हिमालयदक्ष. उत्तर नाही चंकलं. तू
सांगितलस अगदी तस्सच झालं. सूर्य आमच्या जवल राहायला आला, माझ्या पाण्याची वाफ झाली,
ती वाफ आकाशात गेली, पण माझ्याच भागावर बरं का जमिनीचा जो भाग आहे ना तिकडे वाफ
जातच नाही.
पृथ्वी - आणि पाऊस पडतच नाही. मग आता रे काय करायचं?
सांगशील का अजून काही जादू?
हिम. - जादू नाही गं युक्ती.
पृथ्वी - तेच रे. सांग की अजून एक युक्ती.
हिमा. - खगेच सांगतो. तुम्ही असे करा. वा-याकडे जा
स-हांच् त्याला तुमच्या जवल बोलवा. तो आला की, समुद्रावरच्या ढगांना उडविल आणि
जमिनीवर पसरवील.
समुद्र - खरचं की. आम्हाला कसं नाही हे सुचलं? चल ग भाई
आता वा-याकडे जाऊ या.
- म्युझिक -
वारा - अरे अरे अरे, असे लगबगीने कुठे निघालात.
समुद्र - तुझ्याकडेच रे वायू महाराज., पग तू आम्हात्ग
रूवकर दिसलाच नाहीस.
पृथ्वी - आमचं की नाही तुझ्याकडे एक काम आहे. तू आमच्या
जवल राहायला येशील का?
वारा - बापरे ! किनी ही घाई! कारण न सागंताच शेजारी
बोलावताय की.
समुद्र - सांगतो सांगतो. माझ्याजवल खूप पाणी आहे ना ते
या पृथ्वीला हवं आहे. पग ते मी उचलून कसं देणार? त्याच्या उष्णतेमुले पाण्याचे ढग
झाले, पण ते उडून जमिनीच्या भागाकडे जातच नाहीत.
पृथ्वी - तू आमच्या जवल आलास की ढगांना उडवून सगलीकडे
पसरवू शकशील. मग पाउस पडेल आणि मला पाणी मिलेल.
समुद्र - येशील ना तू आमच्या जवल राहांयला?
वारा - येतो की.
पृथ्वी - चल मग जाऊ या तर.
- म्युझिक -
पृथ्वी - ए समुद्र दादा, असा उदास नको बसूस गरा हस नरी
समुद्र - कसा हसू आणि काय काय आता हे ढग तुझ्यापर्यन्त
पोचले पण पाऊस पडतच नाही, तुला पाणी मिलतच नाही. काय करावं आता?
पृथ्वी - सांगू सोपा उपाय? आपण पुन्हा जाऊनहिमालय
पर्वताला विचार,.
समुद्र - पण तो तरी काय सांगणार?
पृथ्वी - सांगेल, सांगेल काही तरी. तो कित्ती तरो हुषार
आहे. हो की नाही?
समुद्र - बरं चलं बघू तरी.
- म्युझिक -
स. - ए हिमालय दादा, आमचा प्रश्न अजून सुटलाच नाही
रे.
हिमा. - आता काय झालं बरं? वा-यामूले सर्व ढग उडून
जमिनीवर येतात ना?
समुद्र - येतात. पण सैरावैरा पळत असतात. पाऊ पडतच नाही.
का पडत नाही रे?
पृथ्वी - का बरं पडत नाही?
हिमा. - खरंच, का बरं पडत नाही? थांबा हं मला जरा
विचार कर, दे.
-म्युझिक-
हिमा. - हं, आलं लक्षात. अरे ते ढग थंड व्हायला हवेत
ना?
पृथ्वी - मग आता काय करायचं?
हिमा. - आता तूच हे काम करायला हवं. हे बघ तू मोठ मोठे
डोंगर तयार कर, त्याच्यावर मोठ मोठी झाडे उगव, ती वाढव. त्या मोठया झाडांमूले ढग
सुसांट पलायचे तर थांबतीलच पण थंडही होतील आणिमग पाऊस पडेल.
पृथ्वी - पण खरंच पाऊस पडेल ना?
हिमा. - हो हो. नक्की पडेल. लक्षात ठेवा, जर मोठी झाडे
नसतील तर पाऊस पडू शकणार नाही. पण जिथे मोठी झाडे असतील, डोंगरावर झाडे असतील,
त्यांचे हात ढगापर्यन्त पोचतील तिथे पाऊस पडेल.
समुद्र - आणि पाऊस पडला की, सगली माती भिजेल आणि अजून
खूप झाडे उगवतील. सगले वातावरण कसे हिरवेगर्द होईल. पण हे सर्व, डोंगर माथ्यावर,
मोठी झाडे आहेत, तो पर्यन्तच,बरं का गं ताई.
-------------------------------------------------------------------------
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें