सोहमचे काऊ-चिऊ
कावळा असतो काळा काळा
करतो काव काव काव
रोज म्हणतो सोहमला
पोळी द्या ना राव
मोर म्हणतो पियाँऊँ
मी किती छान नाचतो
रंगबेरंगी पंख माझे
सगळ्यांना आवडतो
इटुक पिटुक फूलचुसी
लांबच लांब चोच तिची
सुर्रप सुर्रप मध खाण्या
करते फुलांशी दोस्ती
कोकिळ गातो गोड गाणे
पंचमाची लाउन तान
कुहु कुहु चिडवले तर
होतो खूप हैराण
चिऊ चिऊ चिमणी दाणे टिपते
झाडांत तिचा चिवचिवाट
मातीत लोळते, पंख घुसळते
बघा तेंव्हा तिचा थाट
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें