Attachment Om and 4.jpg successfully uploaded and added.
Conversation opened. 1 unread message.
Gmail
COMPOSE
Labels
More
Hangouts
देशदूत नाशिक (1-11-2015) कविता संग्रह
PFA Attachment.
|
Show details
|
क क चे कमळ, दिसते किती छान क ला काना का त्याने लिहीला कान। काळा काळा कावळा गेला दूर उडूनी कसा, कधी, का, काय, किती, कुठे, कुणी। क का कि की कु कू के कै को कौ कं कः सगळ्या अक्षरांची अता मजा पहा। कोकीळ आणि कोकीळा गाती कुहू कुहू कोबडा आरवतो कसा कुकूचकू। कशी जोडी जमली कुलुप आणि किल्ली काळी पांढरी लाल निळी हिरवी आणि अन् पिवळी। कच्ची पक्की कैरी झाडावरून पडली कुणी कुणी तीला मीठ लाऊन खाल्ली। किती किती सांगू कच्या गोष्टी चला पळा आता झाली शाळेला सुट्टी। -------------------------------- ग ग चे गाणे ग ग गवत हिरवे हिरवेगार।। गाय आली तीला गवत हिरवे चार गाय गेली जंगलात, फिरून आली गोठ्यात गाईचा गो-हा आला बागडत बागडत गडबड गुंडा, दगड धोंडा उंदराच्या टोपिला लावा गोंडा ग ग गवत हिरवे गार।। आता तुम्ही ग ची बाराखडी म्हणा ग गा गि गी गु गू गे गै गो गौ गं गः गोल गोल पोळी फुग फुग फुगली गुळ-तुप लावुन गट्टम केली ग ग गवत हिरवे गार।। हर हर गंगे भागीरथी गोदावरी, गंडक आणि गोमती गणपती आले गौरी आल्या पाऊस आला अन् गारा पडल्या
ग ग गवत हिरवे गार।। अंगत पंगत बसवली गंमत जंमत आम्ही केली ग चे गाणे गाईले कोणी आई बाबा आणि सोहमनी ग ग गवत हिरवेगार।। -------------------------------- ख... ख चे अक्षर शिकवायला आली खारूताई हळुच येवुन बसली खिडकीपाशी तिला दिसली खारिक तिला दिसला खजूर तिला दिसली मोठी खोब-याची वाटी आईने बशीत दिले खमन आणि खीर खारुताई खाऊन म्हणे मी ख शिकली आई हसली खि खि खि सोहम हसला खु खु खु बाबा हसले खो खो खो झाली हसाहशी -------------------------------- एकदा काय गंमत झाली एकदा काय गंमत झाली माझ्या पाच बोटांवर पाच अक्षरं येऊन बसली पहिल्या अक्षराचे नावं होते क सांगाल का पाची अक्षरांची नावं हो हो हो क ख ग घ ङ बाई क ख ग घ ङ एकदा काय गंमत झाली माझ्या पाच बोटांवर पाच अक्षरं येऊन बसली पहिल्या अक्षराचे नावं होते च सांगाल का पाची अक्षरांची नावं हो हो हो च छ ज झ ञ बाई च छ ज झ ञ एकदा काय गंमत झाली माझ्या पाच बोटांवर पाच अक्षरं येऊन बसली पहिल्या अक्षराचे नावं होते ट सांगाल का पाची अक्षरांची नावं हो हो हो ट ठ ड ढ ण बाई ट ठ ड ढ ण एकदा काय गंमत झाली माझ्या पाच बोटांवर पाच अक्षरं येऊन बसली पहिल्या अक्षराचे नावं होते त सांगाल का पाची अक्षरांची नावं हो हो हो त थ द ध न बाई त थ द ध न एकदा काय गंमत झाली माझ्या पाच बोटांवर पाच अक्षरं येऊन बसली पहिल्या अक्षराचे नावं होते प सांगाल का पाची अक्षरांची नावं हो हो हो प फ ब भ म बाई प फ ब भ म एकदा काय गंमत झाली माझ्या चार बोटांवर चार अक्षरं येऊन बसली पहिल्या अक्षराचे नावं होते य सांगाल का चारी अक्षरांची नावं हो हो हो य र ल व बाई य र ल व एकदा काय गंमत झाली माझ्या चार बोटांवर चार अक्षरं येऊन बसली पहिल्या अक्षराचे नावं होते श सांगाल का चारी अक्षरांची नावं हो हो हो श ष स ह बाई श ष स ह एकदा काय गंमत झाली माझ्या तीन बोटांवर तीन अक्षरं येऊन बसली पहिल्या अक्षराचे नावं होते ळ सांगाल का तीन्ही अक्षरांची नावं हो हो हो ळ क्ष ज्ञ बाई ळ क्ष ज्ञ (लेखिका सनदी अधिकारी असुन त्या मुख्य सुचना आयुक्त म्हणून गोवा येथून निवृत्त झाल्या आहेत. त्यांचे विविध विषयांवरिल संवेदनशील लेखन प्रसिध्द आहे. लहान मुलांना गेय पध्दतीने बाराखडी शिकवण्यासाठी त्यांनी रचलेल्या बालगीतांपैकी काही निवडक बालगीतं देशदूतच्या वाचकांसाठी.)
देवदूत नाशिक कविता.txt
Open with
Displaying देवदूत नाशिक कविता.txt.