क ला काना का
सोहमने लिहिला क
सोहम साठी आज लिहिलेले गाणे ---
क चे कमळ, दिसते किती छान
क ला काना का त्याने लिहिला कान ।
काळा काळा कावळा गेला दूर उडूनी।
कसा, कधी, का, काय, किती, कुठे, कुणी ।
क का कि की कु कू के कै को कौ कं कः
सगळ्या अक्षरांची आता मजा पहा।
कोकिळ आणि कोकिळा गाती कुहू कुहू
कोंबडा आरवतो कसा कुकूचकू।
कशी जोडी जमली कुलुप आणि किल्ली
काळी पांढरी लाल निळी हिरवी अन पिवळी।
कच्ची पक्की कैरी झाडावरून पडली
कुणी कुणी तिला मीठ लाऊन खाल्ली ।
किती किती सांगू कच्या गोष्टी
चला पळा आता झाली शाळेला सुट्टी।
शनिवार, 11 जुलाई 2015
सदस्यता लें
टिप्पणियाँ भेजें (Atom)
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें