सोहमसाठी आज लिहिलेले नवे गाणे ---
एकदा काय गंमत झाली
माझ्या पाच बोटांवर
पाच अक्षरं येऊन बसली
पहिल्या अक्षराचे नाव होते क
तर सांगाल का पाची अक्षरांची नावं
हो हो हो
क ख ग घ ङ बाई क ख ग घ ङ
एकदा काय गंमत झाली
माझ्या पाच बोटांवर
पाच अक्षरं येऊन बसली
पहिल्या अक्षराचे नाव होते च
तर सांगाल का पाची अक्षरांची नावं
हो हो हो
च छ ज झ ञ बाई च छ ज झ ञ
एकदा काय गंमत झाली
माझ्या पाच बोटांवर
पाच अक्षरं येऊन बसली
पहिल्या अक्षराचे नाव होते ट
तर सांगाल का पाची अक्षरांची नावं
हो हो हो
ट ठ ड ढ ण बाई ट ठ ड ढ ण
एकदा काय गंमत झाली
माझ्या पाच बोटांवर
पाच अक्षरं येऊन बसली
पहिल्या अक्षराचे नाव होते त
तर सांगाल का पाची अक्षरांची नावं
हो हो हो
त थ द ध न बाई त थ द ध न
एकदा काय गंमत झाली
माझ्या पाच बोटांवर
पाच अक्षरं येऊन बसली
पहिल्या अक्षराचे नाव होते प
तर सांगाल का पाची अक्षरांची नावं
हो हो हो
प फ ब भ म बाई प फ ब भ म
एकदा काय गंमत झाली
माझ्या चार बोटांवर
चार अक्षरं येऊन बसली
पहिल्या अक्षराचे नाव होते य
तर सांगाल का चारी अक्षरांची नावं
हो हो हो
य र ल व बाई य र ल व
एकदा काय गंमत झाली
माझ्या चार बोटांवर
चार अक्षरं येऊन बसली
पहिल्या अक्षराचे नाव होते श
तर सांगाल का चारी अक्षरांची नावं
हो हो हो
श ष स ह बाई श ष स ह
एकदा काय गंमत झाली
माझ्या तीन बोटांवर
तीन अक्षरं येऊन बसली
पहिल्या अक्षराचे नाव होते ळ
तर सांगाल का तीन्ही अक्षरांची नावं
हो हो हो
ळ क्ष ज्ञ बाई ळ क्ष ज्ञ
अशी केली गंमत शिकली सगळी अक्षरं
कखगघङ ते ळक्षज्ञ
शुक्रवार, 14 अगस्त 2015
सदस्यता लें
टिप्पणियाँ भेजें (Atom)
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें