शिकवा शिकवा बाराखडी
शिकवा शिकवा बाराखडी
बाराखडी की सोळाखडी ?
संस्कृत मधे आहे म्हणून
शिकवा शिका सोळाखडी.
अआइई चार अक्षरे
उऊऋॠ त्यांच्या पुढे
लृ अन ॡ तर फारच नवे
एऐओऔ ओळखीतले
आता सांगा राहिले कोण
अं आणि अः आणखीन कोण
अआइईउऊऋॠ
लृॡएऐओऔअंअः
अशी आपली सोळाखडी
लौकर शिकली कशी पहा
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें