मराठीसाठी वेळ काढा

मराठीसाठी वेळ काढा

मराठीत टंकनासाठी इन्स्क्रिप्ट की-बोर्ड शिका -- तो शाळेतल्या पहिलीच्या पहिल्या धड्याइतकाच (म्हणजे अआइई, कखगघचछजझ....या पद्धतीचा ) सोपा आहे. मग तुमच्या घरी कामाला येणारे, शाळेत आठवीच्या पुढे न जाउ शकलेले सर्व, इंग्लिशशिवायच तुमच्याकडून पाच मिनिटांत संगणक-टंकन शिकतील. त्यांचे आशिर्वाद मिळवा.

मंगलवार, 10 मार्च 2009

गुलाबाच्या फुलाने यावे -10 तथा फूल- आओ, आओ

गुलाबाच्या फुलाने यावे
दै, लोकमत मधे दि 7 नार्च 2009 रोजी प्रकाशित
लहानपणी आम्ही एक खेळ खेळत असू - “गुलाबाच्या फुलाने यावे”. मजेदार खेळ होता हा. खेळाला कितीही मुली मुलं चालत असत आणि खेळही खूप वेळ चालत असे. खेळात दोन गट असत आणि प्रत्येक गटाचा एक राजा असे. खेळाचे जिंकणे- हरणे पुष्कळअंशी राजाच्या धोरणावरच अवलंबून असे .

खेळासाठी एका मोठया मैदानात 50 ते 100 मीटर अंतरावर दोन लांब रेषा आखून प्रत्येक रेषेवर एकेका गटातील सदस्यांना बसवले जात असे. खेळाच्या नियमानुसार उडया मारत खेळातील प्रत्येक खेळाडूनी दुसर्‍या रेषेपर्यंत पोचायचे आणि ज्या गटाचे सर्व खेळाडू अगोदर दुसर्‍या रेषेवर पोहोचतील तो गट विजयी होई.

पण लांब उडया मारण्याचा संधी कोणाला हाच खरा खेळ होता. प्रत्येक गटाचा राजा आपल्या खेळाडूुना एकेका फुलाचे नाव देत असे. गुलाब, झेंडु, जाई, जुई, कमळ, मोगरा इत्यादि. ही नावे अर्थातच दुसर्‍या गटातील खेळाडूंना माहित नसायची. आता समजा माझ्या गटाने खेळायला सुरुवात करायची आहे आणि मी राजा आहे, तर मी दुसर्‍या राजाला बोलवून माझ्या गटातील एका खेळाडूची निवड करणार. दुसरा राजा माझ्या गटातील खेळाडूचे डोळे झाकून आपल्या गटातील खेळाडूना म्हणेल “गुलाबाच्या फुलाने यावे, टिचकी मारुन जावे”.

यावर दुसर्‍या गटातील ज्या खेळाडूचे नाव गुलाब असेल तो येऊन माझ्या खेळाडूला एक टिचकी मारेल आणि परत आपल्या जागी जाऊन बसेल. आता माझ्या खेळाडूनी ओळखायचे आहे की, त्याला टिचकी कोणी मारली. जर त्याला ओळखता आले तर त्याला उडी मारुन आमच्या रेषेच्या पलीकडे जाण्याचा संधी मिळेल. अशा प्रकारे माझा एक खेळाडू पुढे जाईल आणि माझ्या गटातील सर्वांना कळेल की, दुसर्‍या गटातील गुलाबाचे फूल कोण आहे.

डाव अजूनही माझ्या गटाकडेच असेल. त्यामुळे मी पुन्हा एका खेळाडूची निवड करणार आणि दुसर्‍या गटाचा राजा पुन्हा येऊन त्याचे डोळे बंद करुन म्हणेल “झेंडुच्या फुलाने यावे टिचकी मारुन जावे”. अशा प्रकारे हा खेळ पुढे जात असे. जर माझ्या खेळाडूला टिचकी मारणार्‍याचे नाव ओळखता आले नाही तर आमच्या गटाकडील डाव निघून दुसर्‍या गटाकडे जात असे आणि मग त्यांच्या खेळाडूंना उडी मारुन पुढे यायचा संधी मिळत असे.

हा खेळ कितीही वेळ चालू शकतो. जितके खेळाडू जास्त आणि दोन रेघांमधील अंतर जास्त तितका खेळ जास्त वेळ चालणार. कधी कधी आम्ही दुपारी सुरुवात करुन दिवेलागणीपर्यंत हा खेळ खेळत असू.
- 2 -
या खेळात बहुतेक वेळा माझ्या गटाचा राजा मीच होत असे आणि बहुतेक वेळा आमचाच गट जिंकत असे. यासाठी माझे एक खास धोरण होते. मी नेहमी माझ्या गटातील लहान लिंबू-टिंबू खेळाडूना जास्त वेळा निवडून त्यांना जास्त वेळा लवकर पुढे जाण्याची संधी देत असे. दुसर्‍या गटाचे राजे बहुतेक वेळा उलट धोरण ठेवत असत. ते आधी आपल्या मोठया व पक्क्या खेळाडूना पुढे काढत असत. हे खेळाडू एकेका उडीतच मोठे अंतर ओलांडीत असत. त्यामुळे खेळाच्या सुरवातीलाच चित्र असे असायचे की, माझ्या गटातील कित्येक छोटे खेळाडू रेघेच्या बाहेर निघालेले आहेत. पण अजूनही त्यांनी थोडेसेच अंतर पार केलेले आहे. दुसर्‍या गटातील मोठे खेळाडू मात्र त्यांच्या रेघेच्या बाहेर निघून खूप अंतर पुढे आलेले आहेत.

पण थोडयाच वेळात चित्र उलट होत असे. एव्हाना माझे सर्व छोटे खेळाडू दुसर्‍या रेघेपर्यंत जावून पोहोचलेले असत आणि माझ्या मोठया खेळाडूंसाठी मला कमी उडयांची आवश्यकता असे. दुसर्‍या गटात मात्र मोठे खेळाडू माझ्या रेघेच्या जवळ आलेले असत किंवा कित्येकदा रेघ ओलांडून खेळातूनच बाहेर झालेले असत पण त्यांचे छोटे खेळाडू मात्र अजूनही खूप मागे रहात आणि त्यांच्या उडया छोटया छोटया असल्यामुळे पटापट पुढे येणे शक्य होत नसे. त्याचप्रमाणे दुसर्‍या गटातील जे खेळाडू रेघ ओलांडून जात त्यांना टिचकी मारण्यासाठी बोलावता येत नसल्याने उरलेल्या खेळाडूचे गुप्त नाव लक्षात ठेवणे सोपे होत असे.

या खेळातून मी एक गोष्ट शिकले. जर एकेकच खेळाडू मोजायचा असेल तर दुसर्‍या गटातील जास्त खेळाडू आमची रेघ ओलांडून गेलेले असत. त्यामुळे ते ते खेळाडू जिंकले पण गट मात्र हरला असे चित्र तयार होई. मात्र संपूर्ण गट जिंकायच्या दृष्टीने विचार केला तर सरतेशेवटी माझाच गट जिंकत असे. कारण आमच्या गटातील लहान मुलांना आम्ही आधीच पुढे काढलेले असे.

आजही आपल्याकडे आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा होते तेव्हा मला हा खेळ आठवतो. ज्यांना असे वाटते की, आपला देश आणि समाज हा एकसंध देश आणि समाजाच्या रुपाने इतर देशापेक्षा पुढे यावा, त्यांना नेहमीच आपल्या समाजातील मागे पडलेल्या लोकांचा विचार पहिल्याने करावा लागेल. मागे पडणारी मंडळी मागे राहण्याचे कारण काहीही असो, सामाजिक असो अथवा आर्थिक किंवा स्त्री-पुरुष हे लिंगभेदाचे कारण असो किंवा आदिवासी असण्याचे कारण असो किंवा शहरी-ग्रामीण अथवा दुर्गम डोंगराळ भागाचे कारण असो. कुठल्याही कारणामुळे मागे पडलेल्या सर्व लोकांना एकत्रितपणे पुढे आणण्याचे धोरण चालवणारा देशच इतर देशांच्या तुलनेत पुढे येऊ शकतो. नाहीतर सर्व जगाच्या एकषष्ठांश इतकी मोठी लोकसंख्या असूनही आपण इतर देशांच्या तुलनेत मागेच राहू.
-----------------------------------------------------------------
फूल- आओ, आओ

बचपन में हम एक खेल खेलते थे- फूल आओ आओ। वडा मजेदार खेल था और इसकी कई विशेषताएँ थीं।
खेल कुछ यों था- चाहें जितने बच्चे हों, जिस उमर के हों, सब को दलों में बाँटे लो। हर दल का एक राजा हो। यह राजा ही अपने दल की रणनीति को निर्धारित करेगा।
मैदान में दूर-दूर करीब पचास से सौ मीटर की दूरी पर दो बडी लकीरें खींच कर एक एक लकीर पर एक एक दल के सदस्यों को बैठा दिया जाता था। खेल यही था कि हर सदस्य को छलांगे लगाते हुए दूसरे दल की लकीर तक पहुँचना है, और जिस दल के सभी सदस्य दूसरे पाले में पिल जायेंगे, वही दल जीतेगा।
छलांग कौन लगा सकता है और कैसे? असल खेल यही था। हरेक दल का राजा अपने सदस्यों को एक एक फूल का नाम दे देता था- जैसे
गुलाब, कमल, गेंदा, जूही, चमेली इत्यादि। ये नामदूसरे दल के सदस्यों को नही बताये जाते थे।
अब मान लो पहले दल को खेल आरंभ करना है और मैं राजा हूँ। तो मैं अपना एक खिलाडी चुन कर दूसरे राजा को बताऊँगी। वह आकर मेरे खिलाडी की आँखे बंद करेगा और अपने दल सदस्योंसे कहेगा- चमेली के फूल आओ, आओ, हल्की स्त्री चपत मार कर जाओ।”
इस पर दूसरे दल में जिसे चमेली फूल का नाम दिया है वह आकर मेरे खिलाडी को चपत मारेगा और वापस अपनी जगह पर बैठ जायेगा।
अब मेरे खिलाडी को पहचानना है कि उसे चपत किसने मारी- अर्थात् दूसरे दल में चमेली का फूल कौन था? यदि वह पहचान पाया तो उसे एक छलांग लगा कर अपनी लकीर से आगेआ जाना है। इस प्रकार मेरा एक खिलाडी आगे बढ गया। पारी अब भी मेरा है
इसलिये अब मैं किसी दूसरे खिलाडी का चुनाव करूँगी। दूसरे दलका राजा उसकीआँखेबंद करेगा और कहेगा- गेंदेके फूल आओ आओ, हल्की सी चपत मार कर जाओ। इस प्रकार खेल आगे चलेगा। यदि मेरा खिलाडी पहचानने में चूक कर गया कि उस किसने चपट मारी तो पाटी मेरे हाथ से निकलकर दूसरे राजा के हाथ चली जायगी। इस प्रकार उसके खिलाडियों को आगे आने का मौका मिलेगा।
खेल कितनी देर चलेगा? पालेकी जितने अधिक खिलाडी होंगे और दो लकीरें जितनी दूर होंगी- उसी हिसाब के खेल जल्दी या देर से खतम होगा।मुझे याद है कि कभी कभी हम तीन चार घंटे यही खेल खेलते थे और पूरी शाम निकल जाती।
इस खेलमें मैं अक्सर राजा की भूमिका निभाती थी और मेरा दल हमेशा जीतता था। इसकी एक खास वजह थी। मैं हमेशा अपने दल के
छोटे खिलाडियों को अधिक मौका देती और पहले उन्हीं को आगे जाने की नीति अपनाती थी। दूसरे दल के राजालोग अक्सर इससे उलटा पहले अपने बडे खिलाडियों को आगे आने का मौका देते जो लम्बी लम्बी छलांगों में बडी बडी दूरियाँ पार करते थे। इसलिये खेल की शुरुआत में चित्र यही दीखता था कि मेरे दल के कई छोटे सदस्य थोडा थोडा अंतर काट कर अब भी मेरी के आसपास ही हैं जबकी दूसरे दलके बडे सदस्य अपनी लकीर से काफी आगे निकल आये हैं।
लेकिन आधा खेल दीते बीतते बाजी पलट जाती थी। मेरे छोटे खिलाडी दूसरी लकीर के पास पहुँचे होते थे और बडे खिलाडियों को पार कराने के लिये कम मौकोंकी जरूरत होती थी जबकि दूसरे दल के बडे खिलाडी मेरी लकीर को पार कर खेल से बाहर निकल चुके होते थेलेकिन छोटे सदस्य काफी पीछे रह जाते जिन्हें जल्दी जल्दी आगे लाना संभव नही था। साथ ही दूसरे दल के जो सदस्य लकीर पार कर जाते उन्हें चपत मारने के लिये नही बुलाया जा सकता था। सो बाकी खिलाडियों के नाम याद करना आसान हो जाता था।
इस खेल से मैंने एक बात सीखी- यदि हम एक एक खिलाडी की बात करते हैं तो किसी भी समय देखा जा सकता था कि दूसरे दल के ज्यादा सदस्य लकीर पार कर चुके हैं लेकिन जब दल के जीतने की बात आती थी तब वही दल जीतता जिसने छोटोंको भी मौका देकर आगे निकलवाया हो।
आज जब मैं आरक्षण के नाम पर चलने वाली चर्चा को सुनती हूँ- खासकर विरोध को तो मुझे यह खेल याद आता है। हमें तय करना होगा कि एक देश की, एक दलकी हैसियत से हम एक साथ आगे आना चाहते हैं या नही? यदि हमें अपने देश को दूसरे देशकी तुलना में आगे
लाना है तो उनका विचार अवश्य करना होगा जो किसी भी कारण से पिछड रहे हैं- चाहे वह सामाजिक कारण हो, आर्थिक गरीबी का कारण हो, स्त्री-पुरुष भेद का कारण हो, आदिवासी होने का कारण हो या शहरी-गँवाई भेद का कारण हो। पूरे समाज के पिछडेपन को मिटाकर सबको आगे ले जानेकी नीति बनानेवाला देश ही दूसरे देशों के मुकाबले आगे निकलेगा। अन्यथा विश्व आबादी का छठवाँ हिस्सा अपने पास होते हुए भी हम पिछडे ही रह जायेंगे।

लीना मेहेंदले
E/18, बापूधाम,

चाणक्यपुरी, नई दिल्ली

मनु आणी नोहा -09

मनु आणी नोहा
दै, लोकमत मधे दि 28 फेब्रु.2009 रोजी प्रकाशित
माणसाच्या आयुष्याच्या तुलनेत पृथ्वीचे आयुष्य खूपखूप मोठे आहे. अगदी अब्जावधी वर्षांचे. या आयुष्यात कित्येक उलाढाली होत राहतात. प्रलय काळ ही पण अशीच एक उलाढाल मानली जाते. प्रलय काळाच्या कित्येक भारतीय व ग्रीक पूराण कथा आपल्याला वाचायला मिळतात. त्यातीलच एक कथा मनू राजाची. एकदा मनू राजा नदीत आंघोळ करत असताना एक पिटुकला मासा त्याच्या जवळ येऊन म्हणाला “एवढया मोठया नदीत मी घाबरतो म्हणून तू मला उचलून एखादया छोटयाशा ठिकाणी सुरक्षित ठेव.” मनू राजाने माश्याला ओंजळीत उचलून घेतले आणि एका छोटया भांडयात ठेवुन दिले. चार दिवसातच तो मासा मोठा झाला आणि मनू राजाला म्हणाला आता तू मला थोडया मोठया जागेवर नेऊन ठेव. मग मनूने त्याला एका छोटया तलावात नेऊन ठेवले. काही दिवसांनी मासा तेथेही मोठा झाला. त्याच्या आग्रहावरुन मनूने त्याला एका मोठया तलावात ठेवले.

अशा प्रकारे मासा वाढतच राहिला आणि मनू राजा त्याला लहान पाण्यातून मोठया पाण्यात ठेवत राहिला. शेवटी मासा इतका मोठा झाला की, त्याने मनूला मला समुद्रात नेऊन सोड असा आग्रह धरला. मनूने त्याप्रमाणे केले.

काही वर्षानंतर तो मासा पुन्हा मनूकडे आला आणि म्हणाला “राजा लवकरच मोठा जलप्रलय येणार आहे. त्यावेळी ही सर्व पृथ्वी पाण्याखाली बुडेल म्हणून तू आताच तयारीला लाग. एक मोठी नाव बनव. खूपशा झाडांच्या बिया गोळा कर. सर्व प्रकारचे प्राणी पक्षी आपल्याबरोबर घे आणि समुद्र किनारी येऊन मला हाक मार म्हणजे मी तुझ्या मदतीला येईन.” मनूने त्याप्रमाणे केले. जलप्रलय सुरु झाल्यानंतर मासा मनूच्या नावेजवळ आला. एव्हाना तो मासा खूप मोठा होऊन त्याला एक शिंगही उगवले होते. मनूने माश्याच्या शिंगाला आपली नाव बांधली. माश्याकडे अफाट शक्ती होती. एवढया मोठया जलप्रलयातही तो नाव ओढत घेऊन गेला. एका उंच पर्वताचे फक्त शेवटचे टोकच बुडायचे शिल्लक राहिले होते. त्या टोकाला मनू राजाची नाव नेऊन बांधली. बर्‍याच दिवसांनी जलप्रलय ओसरल्यावर मनूने त्याच्या बरोबर आणलेले सर्व पशुपक्षी, प्राण्यांच्या प्रजाती, माणसे आणि झाडांच्या बिया यांच्या सहाय्याने पुन्हा पृथ्वीवर नवीन संसार उभारला. या गोष्टीतील नावेलाच ग्रीक कथेमध्ये “नोहाज आर्क ” असे म्हटले जाते व ती चांदण्याच्या स्वरुपात आकाशात कुठे दिसते हे मी पुढील अंकात सांगेन.
या गोष्टीवरुन आपल्याला कळते की, पुढील संकटाची चाहूल घेवुन नीट तयारी केली तर संकटानंतरची उभारणी नीट करता येते.
जलप्रलयानंतर थंडीची लाट आणि बर्फ युग येते. त्या काळात खूपसा कार्बन पृथ्वीच्या पोटात दडून राहतो. त्याचे स्वरुप कोळसा, पेट्रोलियम पदार्थ आणि खनिजांचे कार्बोनेट असे असते. पण पृथ्वीच्या वरही कार्बन असतो. घन स्वरुपाचा कार्बन जीवसृष्टी आणि झाडांच्या रुपात राहतो. पण वायु रुपातला कार्बन म्हणजे कार्बनडायऑक्साईड. कार्बन व कार्बनडायऑक्साईडचे संतुलन छान टिकून राहते. जेवढया प्रमाणात घन कार्बन असेल तेवढयाच प्रमाणात कार्बनडायऑक्साईडही असतो. सुमारे दोनशे वर्षापूर्वी पर्यंत हीच स्थिती होती.
परंतु माणसाने एक मोठा प्रश्न निर्माण केला. एकोणीसाव्या शतकात आलेल्या औद्योगिक क्रांतीने चित्र पालटले. आता उद्योगक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वस्तुंची निर्मिती होउ लागली. यासाठी त्यांना इंधनाची आवश्यकता भासली. म्हणून जमिनीखालून कोळसा काढावा लागला. त्याचबरोबर खनिज पदार्थांचीही आवश्यकता भासली आणि पृथ्वीच्या पोटातून खनीज काढून त्याचे शुध्दीकरण करण्यासाठी फॅक्टरी काढाव्या लागल्या. तिथे धातू तयार होतांना कार्बोनेटच्या रुपातील कार्बन डायऑक्साईड बाहेर पडून परत वातावरणात मिसळू लागला.
विसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच खनिज तेलाचा शोध लागला. जमिनीतून मोठ्या प्रमाणात क्रुड ऑईल पण काढलं जाऊ लागलं. त्यापासून पेट्रोल, डिझेल, केरोसिन. एल.पी.जी.गॅस (घरगुती गॅस) इत्यादी बनविले जाऊ लागले. या इंधनांचा वापर उद्योगधंद्यासाठी, वाहने चालविण्यासाठी तसेच घरगुती वापराकरिता होऊ लागला.




आज जगामध्ये प्रतिवर्षी ३६० कोटी टन खनिज तेल, २०० कोटी टन तेलाच्या इतका गॅस तसेच २४० कोटी टन तेलाइतका कोळसा जमिनीच्या पोटातून बाहेर काढून, तो जमिनीवर आणला जातो. यामुळे पृथ्वीवरील कार्बनमध्ये प्रति दिवशी मोठ्या प्रमाणांत वाढ होत आहे. वातावरणातील कार्बन डायऑक्साइड मध्येही वाढ होत आहे. त्यामुळे सूर्याची उष्णता अडविली जाउन तापमानही वाढत आहे. मनुष्याकडे कार्बनला हवेमध्ये सोडून देण्याच्या शंभर वाटा आहेत. जास्त कोळसा, जास्त खनिजं आणी जास्त पेट्रोलियम पदार्थांची खपत हे ते उवाय. परंतु परतीचा वाट एकच आहे. ती म्हणजे वृक्ष. ते असतील तरच हे काम होईल. वृक्षांचा आणखी एक फायदा हा आहे की, इंधनासाठी झाडाची लाकडे, पाने उपयोगात येतील व पृथ्वीच्या पोटात असलेला खनिज तेलाचा साठा, कोळसा इत्यादी एवढ्या मोठ्या प्रमाणांत काढावे लागणार नाहीत. म्हणजेच कार्बनला बाहेर न काढता पृथ्वीच्या पोटातच ठेवून आपण वातावरणाला वाचवू शकू.
--------------------------------------------------------------------