मराठीसाठी वेळ काढा

मराठीसाठी वेळ काढा

मराठीत टंकनासाठी इन्स्क्रिप्ट की-बोर्ड शिका -- तो शाळेतल्या पहिलीच्या पहिल्या धड्याइतकाच (म्हणजे अआइई, कखगघचछजझ....या पद्धतीचा ) सोपा आहे. मग तुमच्या घरी कामाला येणारे, शाळेत आठवीच्या पुढे न जाउ शकलेले सर्व, इंग्लिशशिवायच तुमच्याकडून पाच मिनिटांत संगणक-टंकन शिकतील. त्यांचे आशिर्वाद मिळवा.

बुधवार, 5 दिसंबर 2012

मी प्रयोग शिकले- 1 Text पूर्ण


मी “प्रयोग” शिकले

     मला नववीत असतानाचा तो दिवस अजून आठवतो. प्रयोगशाळेत जाण्याचा पहिला दिवस! भौतिक शास्त्राचा प्रयोग होता- बारा टेबलं मांडलेली होती. प्रत्येकावर एक एक जाड फूटपट्टी व एक चौकोनी ठोकला तसेच दोन- तीन कागद व पेन्सिली ठेवल्या होत्या. आम्ही सर्वजण आपापल्या टेबलाजवळ टेबलाकडे पाठ फिरवून मास्तरांकडे तोंड करुन उभे होते. त्यांच्या पण एका हातात तसाच होक्का व दुस-या हातात फुटपट्टी होती. 
     मास्तरांनी हात उंच करुन होक्का दाखवला. - म्हणाले “आपल्याला आजच्या प्रयोगात या होकल्याच्या कडेची लांबी मोजायची आहे. पाहू या तुमचा 

    पैकी कोण सर्वात आधी मोजून सांगू शकतो ते! हे एकाच सर्व मुलं झर्रकत बद्धली आणि फूटपट्टीच्या “शून्य” या मोठ्या रेघेवर ठोकल्याची एक कड लावून
धरली. मग या कोडेच शेवटच होक जिथे आलं , तिथले फूटपट्टीचे माप वाचले. ६.३इंच हे माझ उत्तर होत. सर्व ठोकले बहुतेक सारख्याच मापाचे होते पण   कुणी उत्तर सांगितल ६.२ इंच तर कुणी मापल ६.४ ते मास्तरांना सांगायला सर्वांनी एकच गलका केला. 
     मास्तरांनी सर्वांना गप्प अस खुणावल. मग म्हणाले- “आत्ता 

     तुम्हीं फक्त आपापल्या कडेची त्यांनी लांबी मोजली. पण हा याला प्रयोग नाही म्हणत. त्यामुळे तुम्ही काढलेलं उत्तर हे प्रयोगांनी सिद्ध झालेलं उत्तर नाही. 
     “प्रयोगांनी सिद्ध उत्तर मिळण्यासाठी काम करावं? लागेल? 
     एका एवजी अनेक निरिक्षणं आणि निरिक्षणांत फरक होणारी कारणं या दोघांच विनेजन आणि समन्वय करता यायला हवा. अनेक निरिक्षणं कशासाठी - तर दोन कारणांनी उत्तर फरक होऊ शकतो म्हणून. एक म्हणजे ----- बाजू आणि सहा कडा आहेत. त्या --- लांबी थोडी फार कमी-जास्त असू शकते. म्हणून आपण प्रत्येक कड 
मोजण्याची आहे. कुठलीतरी एक भेजा आणि सांगा

     मास्तरांना उत्तर असं चालणार नाही. दुसरं असं की अगदी एक कड मोजतांना सुद्धा फरक पडेल. फूटपट्टीवरच्या इंचाच्या रेघाआखण्यांत छोटीशी चूक झाली आहेत. म्हणूनच एक कड मोजतांना देखील तिचा डावा कोपरा “शून्याच्या रेघेवर” अस नाही करायच. कधी तो कोपरा “चार” या रेघेवर कधी “सात” तर कधी “एक” --- आलटून पालटून ठेवायच. मग उजवी बाजू कुठल्या रेघेवर आली ते नोंदवायच- मग उजवीकडील नोंद उजा डावीकडील नोंद गणित करुन त्या कडेची लांबी नोंदवायची या प्रकारे किमान तीन वेळा निरिक्षणं

     व नोंदी घेतल त्या कडेची सरासरी नोंदी काढायची. मग या ठोकल्याच्या इतर बाजूंचीलांबी सुद्धा याच प्राकारे तीन तीन निरिक्षणं नोंदवून सरासरीने काढायची मग त्या सर्व सहा कडांची सरासरी लांबी काडायची. तसेच 
आपल्या प्रयोगाची निरिक्षणं नोंदवतांना आधी त्या कागदावर तुमचं नांव, तुमच्या टेबलाचा क्रमांक, आपली तारीख व वेळ आणि मास्तरांच म्हणजे माझं नांव नोंदवायच.
     “हि सर्व शिस्तलक्षांत आली कां?”
     आम्ही हे ऐकून फारच वैतागून गेलो. पण मास्तरांनी सोडल नाही.सगळ्यांना प्रत्येक कडेची पाच-पाच 

     अशी तीस निरिक्षणं नोंदवायला लावलीच. मग हसत म्हणाले “आजाची फूटपट्टी ही इंच वाली फूटपट्टी होती. उद्या सेंटीमीटरची पट्टी घेऊन प्रयोग करतांना दूसरी गंमत सांगणार आहे.”
     गंमत हा शब्द ऐकल्यावर आमचा बैलग पळून गेलो आणि आम्ही पुढच्या प्रयोगाची वाट पहात , तोच विचार मनांत घेऊन घरी गेलो. (ती गंमत ती तुम्हाला नंतर कधीतरी सांगेन.)
     मुलांनो, आपला देश प्रयोग आणि शोध (दिर्सच) या क्षेत्रांत खूप मागे पडलेला आहे कारण
     प्रयोग करण्यासाठी जो पद्धतशीरपणा आमच्या मास्तरांनी पहिल्याच दिवशी शिकवला होता.तसा आज कुणीच शिकत नाही. दस-बीस-तीस निरिक्षणं घेणं हे त्यांना नको असत. एका निरिक्षणाने काढलेलं उत्तर आणि प्रयोगांनी सिद्ध झालेलं उत्तर याच्यातलं फरक त्यांना समजून येत नाही. ही परिस्थिती अभ्यासाने आणि प्रयोग शील तेनेच बदलता येईल.








कोई टिप्पणी नहीं: