मराठीसाठी वेळ काढा

मराठीसाठी वेळ काढा

मराठीत टंकनासाठी इन्स्क्रिप्ट की-बोर्ड शिका -- तो शाळेतल्या पहिलीच्या पहिल्या धड्याइतकाच (म्हणजे अआइई, कखगघचछजझ....या पद्धतीचा ) सोपा आहे. मग तुमच्या घरी कामाला येणारे, शाळेत आठवीच्या पुढे न जाउ शकलेले सर्व, इंग्लिशशिवायच तुमच्याकडून पाच मिनिटांत संगणक-टंकन शिकतील. त्यांचे आशिर्वाद मिळवा.

बुधवार, 5 दिसंबर 2012

मी प्रयोग शिकले 2- Text पूर्ण


प्रयोगांत -----

     मित्रांनो, मागे मी तुम्हांला भौतिकच्या प्रयोगशाळेतील माझ्या पहिल्या प्रयोग शिकण्याची हकीकत सांगितली. या व रसायन शास्त्राच्या प्रयोगशाळेत मी खूप गोष्टी शिकले ज्या निव्वळ पुस्तक वाचून शिकता येत नाही. कदाचित म्हणूनच थोरा मोठ्यांनी सांगून ठेवले आहे- 
    “केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे.”
     मित्रांनो, पहिल्या दिवशी मी शिकले की जास्त निरिक्षणे करणे, त्यांतून सरासरी काढून मगच निष्कर्ष काढने हा प्रयोगशीलतेचा गाभा आहे. दुस-या दिवशी मी शिकले की यंत्राच्या पलिकडे जाऊन आपली स्वतःची जजमेंटपण वापरायची असते. त्याचे

     असे झाले- 
     मास्तरांनी पुन्हा एकदा आम्हाला त्याच फूटपट्टात आणि तेच ठोकळे दिले व पुन्हा एकदा ठोकळ्याची प्रत्येक कड 
मोजण्यासाठी तीन-तीन निरिक्षणे नोंदवायला सांगितली. पण आज त्यांनी दिलेल्या फूटपट्ट्यांमधे एक गंमत होती. साधारण पट्ट्यांवर एका सेंटीमिटर चे दहा भाग करुन त्यावर दहा छोट्या रेघा आखलेल्या असतात. त्यावरुन आपल्याला मिलिमिटरचे माप कळते. पण त्या दिवशी दिलेल्या पट्ट्यांमध्ये फक्त सेंमी दाखवणा-या रेघा होत्या आणि मधल्या मिलिमिटर दाखवणा-या रेघा पुसलेल्या होत्या.
     आता आली कां पंचाईत? ठोकाचीएक कड घेऊन आम्ही तिचा एक कोपरा सेंमी दर्शवणा-या एखाद्या रेघेना खेटून लावू शकत होतो पण 

     दुस-या टोकाचे कांय करायचे? तो दोन रेघांच्या मध्येच कुठेतरी असायचा, ---- तो सात आणि आठ सेंमी दर्शवणा-या दोन रेघांच्या मधे असेल तर निरीक्षणं काय नोंदवायचे सात की आठ? 
     मग मास्तरांनी आपल्या eye estimate चे महत्व सांगितले. सात आणि आठ सेंमी च्या दोन कुणांच्या मधे 
साधारण कुठेसा तो कोपरा आहे ? त्यावर तुमच्या अंदाजाने लिहा. ३ सेंत्र, किंवा ४ किंवा , ७सेंमी, मग आम्ही निरिक्षण हीच असा उत्तर लिहिला.


निरिक्षण संख्या
डाव्या कोप-याचे िरिक्षण
उजव्या कोप-याचे निरिक्षण
लांबी सेंमी


पहिले
---
एकूण
पहिले
---
एकूण

.०
२.०
.३
८.३
६.३
.०
६.०
१२
.४
१२.४
६.४
.०
३.०
.२
९.२
६.२
.०
७.०
१३
.४
१३.४
६.४

सरासरी लांबी = ६.३ सेंत्री

     अशा रितीने आम्ही शिकलो की जर यंत्र कमी पडत असेल तर आपल्या ज्ञानेद्रियांच्या सहाय्याने आपण निरिक्षण नोंदवायचे. त्यात आमची चूक राहिल पण न नोंदवण्यापेक्षा ते बरे. तसेच दोन लोकांना तेच निरिक्षण वेगळे वाटेल.
  
     ज्याला मी .३ नोंदवले, त्याला कुणी .४ सेंमी. पण नोंदवू शकेल मात्र .३ आणि .८ सेमी इतका फरक येणार नाही.
     मोठेपणी मात्र या धड्याचा खूप फायदा झाला. मला कळले की जी खूणगांठ यंत्राच्या बाबतीत होती, तीच प्रशासनांच्या नियंत्रणांच्या बाबतीतही खरी होती.दोन नियंत्रांच्या मधे कांही तरी मोकळी जागा असते- तिथे आपण आपले “जजमेंट” वापरायचे असते. तेवढ्या छोट्या भागापुरते ते सब्जेक्टिव्ह असेल- म्हणजे एकाला एक वाटेल तर दुस-याला थोडेसे वेगळे वाटेल. पण ते करण्याचे आणि नमूद करायचे आणि त्या आधारे पुढे जायचे. ---- नाही म्हणून सर्वस्वी 

     सोडून नाही द्यायचे. 
     तसेच एखादा निर्णय घेतांना त्यात सब्जेक्टिव्ह किती आणि ऑब्जेक्टिव्ह किती असून चालेल?फूटपट्टीच्या प्रत्येक निरीक्षणांत ६ सेमी हे नक्की होते- फक्त वरचा थोडासा भआग .३ का .४ का .२ एवढाच प्रश्न होता. आपल्या बघण्यांतही सुमारे ९५ टक्के ऑब्जेक्टिव्ह राहिला 
पाहिजेतर सर्वांना समतेने व समतोलाने न्याय मिळेल. त्याच बरोबर चार-पाच टक्के सब्जेक्टिव्ह रहाणे पण आवश्यक असते नाही तर आपल्यांत आणि यंत्रांत कांय फरक राहिल?























कोई टिप्पणी नहीं: