मंगलवार, 1 सितंबर 2015
शनिवार, 22 अगस्त 2015
ख चे अक्षर शिकायला आली खारुताई Kha che Akshar Shikayala Ali Kharutai लीन...
ख चे अक्षर शिकायला आली खारुताई
हळूच येऊन बसली खिडकीपाशी
तिला दिसली खारिक तिला दिसला खजूर
तिला दिसली मोठ्ठी खोबऱ्याची वाटी
आईने बशीत दिले खमण आणि खीर
खारुताई खाऊन म्हणे मी ख शिकली
आई हसली खि खि खि सोहम हसला खू खू खू
बाबा हसला खो खो खो झाली हसाहशी
रविवार, 16 अगस्त 2015
शुक्रवार, 14 अगस्त 2015
क ख ग घ ङ बाई क ख ग घ ङ
सोहमसाठी आज लिहिलेले नवे गाणे ---
एकदा काय गंमत झाली
माझ्या पाच बोटांवर
पाच अक्षरं येऊन बसली
पहिल्या अक्षराचे नाव होते क
तर सांगाल का पाची अक्षरांची नावं
हो हो हो
क ख ग घ ङ बाई क ख ग घ ङ
एकदा काय गंमत झाली
माझ्या पाच बोटांवर
पाच अक्षरं येऊन बसली
पहिल्या अक्षराचे नाव होते च
तर सांगाल का पाची अक्षरांची नावं
हो हो हो
च छ ज झ ञ बाई च छ ज झ ञ
एकदा काय गंमत झाली
माझ्या पाच बोटांवर
पाच अक्षरं येऊन बसली
पहिल्या अक्षराचे नाव होते ट
तर सांगाल का पाची अक्षरांची नावं
हो हो हो
ट ठ ड ढ ण बाई ट ठ ड ढ ण
एकदा काय गंमत झाली
माझ्या पाच बोटांवर
पाच अक्षरं येऊन बसली
पहिल्या अक्षराचे नाव होते त
तर सांगाल का पाची अक्षरांची नावं
हो हो हो
त थ द ध न बाई त थ द ध न
एकदा काय गंमत झाली
माझ्या पाच बोटांवर
पाच अक्षरं येऊन बसली
पहिल्या अक्षराचे नाव होते प
तर सांगाल का पाची अक्षरांची नावं
हो हो हो
प फ ब भ म बाई प फ ब भ म
एकदा काय गंमत झाली
माझ्या चार बोटांवर
चार अक्षरं येऊन बसली
पहिल्या अक्षराचे नाव होते य
तर सांगाल का चारी अक्षरांची नावं
हो हो हो
य र ल व बाई य र ल व
एकदा काय गंमत झाली
माझ्या चार बोटांवर
चार अक्षरं येऊन बसली
पहिल्या अक्षराचे नाव होते श
तर सांगाल का चारी अक्षरांची नावं
हो हो हो
श ष स ह बाई श ष स ह
एकदा काय गंमत झाली
माझ्या तीन बोटांवर
तीन अक्षरं येऊन बसली
पहिल्या अक्षराचे नाव होते ळ
तर सांगाल का तीन्ही अक्षरांची नावं
हो हो हो
ळ क्ष ज्ञ बाई ळ क्ष ज्ञ
अशी केली गंमत शिकली सगळी अक्षरं
कखगघङ ते ळक्षज्ञ
एकदा काय गंमत झाली
माझ्या पाच बोटांवर
पाच अक्षरं येऊन बसली
पहिल्या अक्षराचे नाव होते क
तर सांगाल का पाची अक्षरांची नावं
हो हो हो
क ख ग घ ङ बाई क ख ग घ ङ
एकदा काय गंमत झाली
माझ्या पाच बोटांवर
पाच अक्षरं येऊन बसली
पहिल्या अक्षराचे नाव होते च
तर सांगाल का पाची अक्षरांची नावं
हो हो हो
च छ ज झ ञ बाई च छ ज झ ञ
एकदा काय गंमत झाली
माझ्या पाच बोटांवर
पाच अक्षरं येऊन बसली
पहिल्या अक्षराचे नाव होते ट
तर सांगाल का पाची अक्षरांची नावं
हो हो हो
ट ठ ड ढ ण बाई ट ठ ड ढ ण
एकदा काय गंमत झाली
माझ्या पाच बोटांवर
पाच अक्षरं येऊन बसली
पहिल्या अक्षराचे नाव होते त
तर सांगाल का पाची अक्षरांची नावं
हो हो हो
त थ द ध न बाई त थ द ध न
एकदा काय गंमत झाली
माझ्या पाच बोटांवर
पाच अक्षरं येऊन बसली
पहिल्या अक्षराचे नाव होते प
तर सांगाल का पाची अक्षरांची नावं
हो हो हो
प फ ब भ म बाई प फ ब भ म
एकदा काय गंमत झाली
माझ्या चार बोटांवर
चार अक्षरं येऊन बसली
पहिल्या अक्षराचे नाव होते य
तर सांगाल का चारी अक्षरांची नावं
हो हो हो
य र ल व बाई य र ल व
एकदा काय गंमत झाली
माझ्या चार बोटांवर
चार अक्षरं येऊन बसली
पहिल्या अक्षराचे नाव होते श
तर सांगाल का चारी अक्षरांची नावं
हो हो हो
श ष स ह बाई श ष स ह
एकदा काय गंमत झाली
माझ्या तीन बोटांवर
तीन अक्षरं येऊन बसली
पहिल्या अक्षराचे नाव होते ळ
तर सांगाल का तीन्ही अक्षरांची नावं
हो हो हो
ळ क्ष ज्ञ बाई ळ क्ष ज्ञ
अशी केली गंमत शिकली सगळी अक्षरं
कखगघङ ते ळक्षज्ञ
मंगलवार, 14 जुलाई 2015
ग चे गाणे
ग चे गाणे
ग
ग गवत हिरवे हिरवेगार ।।
गाय
आली तिला गवत चार ।।
गाय
गेली जंगलात,
फिरुन
आली गोठ्यात
गाईचा
गोऱ्हा आला बागडत बागडत
गडबड गुंडा, दगड धोंडा
गडबड गुंडा, दगड धोंडा
उंदराच्या टोपीला लावा गोंडा
ग ग गवत हिरवेगार ।।
ग ग गवत हिरवेगार ।।
आता
तुम्ही गची बाराखडी म्हणा
ग
गा गि गी गु गू गे गै गो गौ गं
गः
गोल
गोल पोळी फुग फुग फुगली
गूळ-तूप
लाऊन गट्टम केली
ग ग गवत हिरवेगार ।।
ग ग गवत हिरवेगार ।।
हर
हर गंगे भागीरथी
गोदावरी,
गंडक
आणि गोमती
गणपति
आले गौरी आल्या
पाऊस
आला गारा पडल्या
ग ग गवत हिरवेगार ।।
ग ग गवत हिरवेगार ।।
अंगत
पंगत बसवली
गंमत
जंमत आम्ही केली
ग
चे गाणे गाइले कुणी
आई
बाबा आणि सोहमनी
ग ग गवत हिरवेगार ।।
------------------------------------------
ग ग गवत हिरवेगार ।।
------------------------------------------
शनिवार, 11 जुलाई 2015
क चे कमळ, दिसते किती छान
क ला काना का
सोहमने लिहिला क
सोहम साठी आज लिहिलेले गाणे ---
क चे कमळ, दिसते किती छान
क ला काना का त्याने लिहिला कान ।
काळा काळा कावळा गेला दूर उडूनी।
कसा, कधी, का, काय, किती, कुठे, कुणी ।
क का कि की कु कू के कै को कौ कं कः
सगळ्या अक्षरांची आता मजा पहा।
कोकिळ आणि कोकिळा गाती कुहू कुहू
कोंबडा आरवतो कसा कुकूचकू।
कशी जोडी जमली कुलुप आणि किल्ली
काळी पांढरी लाल निळी हिरवी अन पिवळी।
कच्ची पक्की कैरी झाडावरून पडली
कुणी कुणी तिला मीठ लाऊन खाल्ली ।
किती किती सांगू कच्या गोष्टी
चला पळा आता झाली शाळेला सुट्टी।
सोहमने लिहिला क
सोहम साठी आज लिहिलेले गाणे ---
क चे कमळ, दिसते किती छान
क ला काना का त्याने लिहिला कान ।
काळा काळा कावळा गेला दूर उडूनी।
कसा, कधी, का, काय, किती, कुठे, कुणी ।
क का कि की कु कू के कै को कौ कं कः
सगळ्या अक्षरांची आता मजा पहा।
कोकिळ आणि कोकिळा गाती कुहू कुहू
कोंबडा आरवतो कसा कुकूचकू।
कशी जोडी जमली कुलुप आणि किल्ली
काळी पांढरी लाल निळी हिरवी अन पिवळी।
कच्ची पक्की कैरी झाडावरून पडली
कुणी कुणी तिला मीठ लाऊन खाल्ली ।
किती किती सांगू कच्या गोष्टी
चला पळा आता झाली शाळेला सुट्टी।
सदस्यता लें
संदेश (Atom)