मराठीसाठी वेळ काढा

मराठीसाठी वेळ काढा

मराठीत टंकनासाठी इन्स्क्रिप्ट की-बोर्ड शिका -- तो शाळेतल्या पहिलीच्या पहिल्या धड्याइतकाच (म्हणजे अआइई, कखगघचछजझ....या पद्धतीचा ) सोपा आहे. मग तुमच्या घरी कामाला येणारे, शाळेत आठवीच्या पुढे न जाउ शकलेले सर्व, इंग्लिशशिवायच तुमच्याकडून पाच मिनिटांत संगणक-टंकन शिकतील. त्यांचे आशिर्वाद मिळवा.

मंगलवार, 14 जुलाई 2015

ग चे गाणे

ग चे गाणे 
ग ग गवत हिरवे हिरवेगार ।।
गाय आली तिला गवत चार ।।
गाय गेली जंगलात, फिरुन आली गोठ्यात
गाईचा गोऱ्हा आला बागडत बागडत
गडबड गुंडादगड धोंडा
उंदराच्या टोपीला लावा गोंडा
ग ग गवत  हिरवेगार ।।
आता तुम्ही गची बाराखडी म्हणा
ग गा गि गी गु गू गे गै गो गौ गं गः
गोल गोल पोळी फुग फुग फुगली
गूळ-तूप लाऊन गट्टम केली
ग ग गवत  हिरवेगार ।।
हर हर गंगे भागीरथी
गोदावरी, गंडक आणि गोमती
गणपति आले गौरी आल्या
पाऊस आला गारा पडल्या
ग ग गवत  हिरवेगार ।।
अंगत पंगत बसवली
गंमत जंमत आम्ही केली
ग चे गाणे गाइले कुणी
आई बाबा आणि सोहमनी
ग ग गवत हिरवेगार ।।
------------------------------------------

शनिवार, 11 जुलाई 2015

क चे कमळ, दिसते किती छान

क ला काना का

सोहमने लिहिला क


सोहम साठी आज लिहिलेले गाणे ---
क चे कमळ, दिसते किती छान
क ला काना का  त्याने लिहिला कान ।
काळा काळा कावळा गेला दूर उडूनी।
कसा, कधी, का, काय, किती, कुठे, कुणी ।
क का कि की कु कू के कै को कौ कं कः
सगळ्या अक्षरांची आता मजा पहा।
कोकिळ आणि कोकिळा गाती कुहू कुहू
कोंबडा आरवतो कसा कुकूचकू।
कशी जोडी जमली कुलुप आणि किल्ली
काळी पांढरी लाल निळी हिरवी अन पिवळी।
कच्ची पक्की कैरी झाडावरून पडली
कुणी कुणी तिला मीठ लाऊन खाल्ली ।
किती किती सांगू कच्या गोष्टी
चला पळा आता झाली शाळेला सुट्टी।