मराठीसाठी वेळ काढा

मराठीसाठी वेळ काढा

मराठीत टंकनासाठी इन्स्क्रिप्ट की-बोर्ड शिका -- तो शाळेतल्या पहिलीच्या पहिल्या धड्याइतकाच (म्हणजे अआइई, कखगघचछजझ....या पद्धतीचा ) सोपा आहे. मग तुमच्या घरी कामाला येणारे, शाळेत आठवीच्या पुढे न जाउ शकलेले सर्व, इंग्लिशशिवायच तुमच्याकडून पाच मिनिटांत संगणक-टंकन शिकतील. त्यांचे आशिर्वाद मिळवा.

शनिवार, 14 फ़रवरी 2009

पृथ्वीच्या पोटातला कार्बन काढू या नको. -08

पृथ्वीच्या पोटातला कार्बन काढू या नको.
लीना मेंहदळे
leena.mehendale@gmail.com
published in Lokmat on 21 Feb 2009
कांही वर्षापूर्वी आपल्याकडे त्सुनामी लाट आली, नंतर अमेरिकेमध्ये कतरिनाची तुफानी लाट आली. हे आपल्याला काय संकेत देतात ? दोन वर्षापूर्वी गुजरात, नंतर बिहार व मध्यप्रदेश मग लगेच मुंबई, महाराष्ट्र व कर्नाटक आणि मध्यप्रदेश ही सतत पूरजन्य परिस्थितीत होती. या सर्व घटना कोणत्या नैसर्गिक कारणांना जोडलेल्या आहेत ? यावर विचार करण्याची जबाबदारी आज सर्वांची आहे, मग ती सामान्य माणसं असोत की सरकार असो..
मनुष्य हा निरंतर विकास करणारा प्राणी आहे. प्रगती आणि विकासासाठी पृथ्वी, अंतराळासहित सर्व महाभूतांवर विजय मिळविण्याची मानवाची क्षमता आहे. परंतु अंधाधुंद विजय मिळविण्याने उन्नती होत नाही. यश पचविणे, त्याला आत्मसात करणे आणि त्यातून चिरस्थायी प्रगतीची घडी कशी बसेल हे पाहाणे महत्वाचे आहे. मनुष्याने निसर्गावर विजय मिळविला असेल देखील, पण जर तो आत्मसात करुन निसर्गाबरोबर सामंजस्य ठेवले नाही तर निसर्ग सुध्दा बदला घेतल्याशिवाय राहात नाही, हेच वरील घटना दाखवितात.
दोन तीनशे वर्षापूर्वी पासूनच्या इतिहासात जागतिक तापमानाचा ग्राफ खालून वर असा होता. याचा अर्थ असा की पृथ्वीवर वायुमंडळाचे तापमान वाढतच राहिले आहे. परंतु त्यातल्या त्यांत मागील शंभर वर्षात तपमानात खूपच वाढ झाली आहे. या तापमानाच्या वाढीचे परिणाम त्सुनामी, कतरिनाच्या स्वरुपात दिसू लागते. तसेच कित्येक राज्याने पूरस्थिती देखील सोसली आहे त्याचेही कारण हेच. पण तापमान का वाढते ? याचे कारण समजणे खूप सोपे आहे.
पृथ्वीच्या पोटामध्ये खूप प्रमाणात कार्बन आहे आणी पृष्ठभागवर पण आहे.. संपूर्ण जीवसृष्टीचा आधारच कार्बन आहे. हा कार्बन ज्वलनशील आहे. ऑक्सीजनमध्ये कार्बनचे ज्वलन झाल्यावर कार्बन डायऑक्साईड बनतो, आणि या प्रक्रियेतूनच उष्णता बाहेर पडते. ती जर आपण पकडू शकलो तर तिचा उपयोग इंधन किंवा विजेसाठी करु शकतो. आपल्या दैनंदिन व्यवहारासाठी इंधन हे महत्वाचे आहे. उदा. कोळसा, लाकडे, स्वयपांकाचा गॅस, पेट्रोल, डिझेल, फ्युएल ऑईल आणि रॉकेल या सर्व इंधनात कार्बनचे मोठे प्रमाण असते,
पृथ्वीवर जो कांही कार्बन आहे, त्याचे आपले एक चक्र बनलेले आहे. जेव्हा कार्बन जळतो, तेव्हा तो कार्बन डायऑक्साइड बनतो आणि वातावरणात सामावून जातो. तेथूनच मग वृक्ष आपल्या श्वासाबरोबर त्याला आत घेतात आणि उन्हाच्या मदतीने कार्बन व ऑक्सीजन वेगवेगळे करतात. तो ऑक्सीजन पुन्हा वातावरणात सोडला जातो, आणि आपल्याला श्वासासाठी शुध्द हवा मिळते. कार्बन हा घन पदार्थाच्या रुपाने झाडांची पाने, फुले व बीयांमध्ये राहतो. या सर्व वनस्पतीजन्य गोष्टींना इतर जीवसृष्टी खाते आणि तो कार्बन त्यांच्या शरीराचा एक हिस्सा बनतो. ते प्राणी मेल्यावर त्यांचे र्निजीव शरीर जेव्हां सडेल, गळून पडेल किंवा जळेल तेव्हां त्यातून कार्बन डायऑक्साईड निघून हवेत मिसळेल, मग ते जीव-जन्तु असोत, झाडे-झुडपे असोत किंवा मानव प्राणी असो. किंवा त्यातील कांही कार्बन डायऑक्साइड मातीमध्ये मिळून जातो, आणि खनिजांच्या कार्बोनेटच्या स्वरुपात तेथे राहतो. जेव्हा आपण खनिज पदार्थांपासून धातू निर्माण करतो जसे लोखंड, तांबे, अल्युमिनियम इत्यादी, तेव्हा त्यांच्याबरोबर असलेला कार्बन डायऑक्साइड बाहेर पडून हवेमध्ये परत जातो.
अशाप्रकारे वातावरणातून झाडांमध्ये, तेथून प्राणीमात्रांच्या शरीरामध्ये आणि तेथून कार्बोनेटच्या रुपात मातीमध्ये कार्बन परत येतो. किंवा झाडं किंवा प्राणांचे शरीर सडून गेल्यावर परत कार्बन डायऑक्साइडच्या रुपात वातावरणात मिसळतो. अशाप्रकारे कार्बनचे चक्र चालू रहाते.
सूर्याच्या किरणांनी पृथ्वीवर उष्णता येते. त्यासाठी कार्बन डायऑक्साइड एकप्रकारे दरवाजाचे (संरक्षणाचे) काम करते. सूर्य किरणांपासून मिळणारी उष्णता पृथ्वीच्या आवरणातील अनेक अडथळे पार करुन पृथ्वीपर्यंत येऊन पोहोचते. परंतु हीच उर्जा रात्री अवरक्त किरणांच्या (Infra Red Rays) रुपात पुन्हा पृथ्वीच्या वातारणाच्या बाहेर जाऊ पहात असेल तर कार्बन डायऑक्साइडचा थर तिला मोठ्या प्रमाणांत अडवू शकतो.
ज्या दिवशी वातावरणांत कार्बन डायऑक्साइडची पातळी कमी असेल, तेव्हां तो उष्णतेला बाहेर जाऊ देतो आणि त्यामुळे वातावरणाचे तपमान वाढत नाही. काच पण अशाच प्रकारे दरवाजाचे काम करते. म्हणून तिचा उपयोग ग्रीन हाऊसमध्ये केला जातो. तेथे तो गुण लाभदायक आहे. परंतु जेव्हां कार्बन डायऑक्साइड वातावरणात मोठ्या प्रमाणात वाढतो, तेव्हां जागतिक तपमानात वाढ होते, व त्यामुळे पर्वतावर जमा झालेला बर्फ वितळायला लागतो. त्यामुळे पूर व तुफानासारखी परिस्थिती निर्माण होते.
यावरुन हेही महत्वाचे लक्षांत येते की, पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या बाहेर जो कार्बन आहे, त्याची कार्बन डायऑक्साइड आणि कार्बन अशी वाटणी आहे, त्या दोन्ही मध्ये संतुलन राहते. कार्बन डायऑक्साइडला वृक्षांनी शोषून घेतले तर वातारणातील तपमानांत वरचेवर वाढ होणार नाही. अशाप्रकारे झाडं-झुडपांच्या सहाय्याने कार्बन चक्राचे संतुलन व्यवस्थित राहते.
मग आता वेळ कशाला दवडायचा ? चला तर आपणही वृक्षारोपण करु या.
-------------------------------------------------------------------------

2 टिप्‍पणियां:

HAREKRISHNAJI ने कहा…

Well said

Nandlal ने कहा…

अत्यंत अभ्यास पुर्णलेख .